तळेगाव दाभाडे | २६ ऑक्टोबर २०२६ : पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याच्या आरोपावरून पाच तरुणांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. दरोडा घालण्यासाठी लागणारी साधनसामग्री घेऊन हे तरुण एकत्र आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत घडली. वडगाव फाटा येथील अलिकडील वडाचे झाडापासून सुमारे ३० मीटर अंतरावर, सीआरपीएफच्या पक्क्या बांधकाम असलेल्या कंपाऊंडलगत, तळेगाव दाभाडे येथे आरोपी आढळले.
या प्रकरणी विशाल दादाराम थोरात (वय ३१ वर्षे, पोलीस शिपाई, नेमणूक तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आर्यन अनिल गरुड (वय १९ वर्षे, रा. संस्कृती अपार्टमेंट, तळेगाव दाभाडे), यश प्रल्हाद राजगुरू (वय १८ वर्षे, रा. संभाजीनगर, पाण्याच्या टाकीजवळ), विशाल शिवाजी गुंजाळ (वय २० वर्षे, रा. भिमाशंकर कॉलनी, कृष्ण डेअरीजवळ), गुरु संतोष गरुड (वय २४ वर्षे, रा. भेगडे आळी, कान्होबा मंदिर परिसर) आणि हर्षल सतीष सोनवणे (वय १९ वर्षे, रा. सह्याद्री शाळेजवळ, टकले वस्ती) अशी आहेत.
फिर्यादीनुसार, आरोपी क्रमांक एक ते पाच हे दरोडा घालण्यासाठी लागणारी साधनसामग्री घेऊन दरोडा घालण्याच्या उद्देशाने एकत्र आले होते, असा पोलिसांचा आरोप आहे. संबंधित ठिकाणी त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९५/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१०(४), ३१०(५) तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.