जीएसटी न भरता व्यापाऱ्याची ३५ लाखांची फसवणूक

जीएसटी न भरता व्यापाऱ्याची ३५ लाखांची फसवणूक

भोसरी | २१ ऑक्टोबर २०२६ : भोसरीतील अशोक मोटर पार्ट्स या दुकानातील दोन कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट बिलांचा वापर आणि जीएसटीची रक्कम न भरता दुकानमालकाची ३४ लाख ९६ हजार ९६३ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २०२० ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भोसरीतील आंबेडकर चौक, डी. सी. चेंबर येथील अशोक मोटर पार्ट्स या दुकानात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी राजा ओमप्रकाश गोधवाणी (वय ४६ वर्षे, व्यवसाय व्यापार, राहणार पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये जब्बार शयफुद्दीन पटेल (वय ३२ वर्षे, राहणार थेरगाव, चिंचवड) आणि मकरंद अनिल घेवारी (वय ४० वर्षे, राहणार गाळा क्रमांक ७, स्वास्तिक कंपनी, सेक्टर १०/२३, भोसरी, पुणे) यांचा समावेश आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दोन्ही आरोपी दुकानातील व्यवहाराशी संबंधित कामे पाहत होते. जब्बार पटेल हा अकाउंट्सचे, तर जीएसटी भरण्याचे काम पाहत होता.

आरोपी जब्बार पटेल याने फिर्यादीच्या दुकानातील वस्तूंची बिले आपले फर्म तसेच मकरंद घेवारी यांच्या मातोश्री इंजिनिअर्स वर्क कंपनीच्या नावाने तयार केल्याचा आरोप आहे.

या व्यवहारात मातोश्री इंजिनिअर्स वर्क कंपनीची ९ लाख २७ हजार १६२ रुपये आणि जब्बार पटेलच्या सेव्हन स्टार इंडस्ट्रियल सप्लायर कंपनीची २५ लाख ६९ हजार ७१४ रुपये जीएसटीची रक्कम न भरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या दोघांनी संगनमत करून संबंधित रक्कम स्वतःकडे ठेवत फिर्यादीची एकूण ३४ लाख ९६ हजार ९६३ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५८/२०२६ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories