तळेगाव दाभाडे | २१ ऑक्टोबर २०२६ : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटणे खिंड परिसरात ४० हजार रुपये किमतीचा बोकड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. एका अज्ञात रिक्षाचालकाने बोकड चोरून नेल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटणे खिंड येथे घडली.
या प्रकरणी ताया खंडू पाडुळे (वय २८ वर्षे, व्यवसाय मेंढीपालन, राहणार मोरटी, तालुका बारामती, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, MH14 JP 6439 क्रमांकाच्या रिक्षावरील एका अज्ञात चालकाने त्यांचा ४० हजार रुपये किमतीचा बोकड चोरून नेला.
या घटनेनंतर फिर्यादीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ४८६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर करीत आहेत.