भोसरीत हॉस्पिटल पार्किंगमधून 25 हजारांची दुचाकी चोरीला

भोसरीत हॉस्पिटल पार्किंगमधून 25 हजारांची दुचाकी चोरीला

भोसरी :  भोसरी परिसरात मंकीकर हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अनिल राजेंद्र पाटील (वय २८, रा. भोसरी) यांनी पोलिसांत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, पाटील यांची निळ्या रंगाची यामाहा एफझेड कंपनीची दुचाकी आहे.

फिर्यादी यांनी 1 नोव्हेंबर च्या रात्री आपली दुचाकी मंकिकर हॉस्पिटलच्या खालील पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केली होती. त्यानंतर 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबरच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत 25 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी 5 नोव्हेंबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस हवालदार पुजारी तपास करीत आहेत.

नागरिकांनी सार्वजनिक तसेच हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये वाहने उभी करताना वाहन व्यवस्थित लॉक करावे. शक्य असल्यास अतिरिक्त सुरक्षा लॉकचा वापर करावा आणि वाहनाची सुरक्षित जागी पार्किंग करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories