चाकणमध्ये हिट अँड रन! भरधाव दुचाकीची महिलेला धडक ; चालक फरार

चाकणमध्ये हिट अँड रन! भरधाव दुचाकीची महिलेला धडक ; चालक फरार

चाकण परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघतात महिला गंभीर जखमी झाली असल्याची माहिती आहे. अपघातानंतर दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (4 नोव्हेंबर) संध्याकाळी 7.30 च्या सुमारास आळंदी बाजूकडून पिंपळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. संबंधित महिला परिसरातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने त्यांची घरी जेवण घेऊन जात होती. यावेळी आळंदी बाजू कडून पिंपळगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने महिलेला जोरदार धडक दिली. 

या धडकेमुळे महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला आणि उजव्या पायाला दुखापत झाली. महिलेला गंभीर दुखापत झाल्याने उठताही येत नसल्याने तिथून जाणाऱ्या नागरिकांनी तिला उपचारासाठी पिंपळगाव येथील आवटे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघतात महिलेच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून डोळ्यांना सूज येऊन काळेनिळे व्रण पडले आहेत. उजव्या पायाच्या गुडघ्याखाली फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

दरम्यान, महिलेला धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी गुरूवारी (५ नोव्हेंबर) रोजी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार लोखंडे करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories