अजितदादांच्या स्मृतींना अनोखे अभिवादन; प्रभाग ११ मध्ये हजारो पणत्यांचे वाटप

अजितदादांच्या स्मृतींना अनोखे अभिवादन; प्रभाग ११ मध्ये हजारो पणत्यांचे वाटप

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एक विशेष आणि अनोखा प्रयत्न करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांच्या पुढाकारातून विशेष समाजसेवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रभाग 11 मध्ये दिवाळीचे औचित्य साधून कृष्णानगर, महात्मा फुलेनगर, शरदनगर, घरकुल यासह परिसरातील हजारो घरांमध्ये पणतीचे वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

'एक पणती प्रेमाची... एक ज्योत आठवणींची... एक नाव अजितदादांचे!' या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. अजित पवार यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. त्यांच्या कार्याची आणि आठवणींची ज्योत कायम तेवत राहावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

याबाबत बोलताना मारुती जाधव म्हणाले की, "अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेली प्रेरणा, सर्वसामान्य माणसांप्रती असलेली आपुलकी आणि त्यांच्या आठवणी आमच्या हृदयात कायम आहेत. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हजारो घरांमध्ये पणती पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक घरात पणतीचा प्रकाश उजळताना अजितदादांच्या आठवणींची ज्योतही तेवत राहावी, हीच आमची भावना आहे."

या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ पणतीचे वाटप न करता प्रेम, आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मारुती गणपत जाधव, कीर्ती मारुती जाधव आणि कीर्ती ताई मारुती जाधव युथ फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कृष्णानगर, महात्मा फुलेनगर, शरदनगर, घरकुल आणि प्रभाग क्रमांक ११ मधील परिसरात पणतीचे वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories