घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून केली चोरी; आरोपीला अटक

घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून केली चोरी; आरोपीला अटक

चिखली | २१ ऑक्टोबर २०२६ : चिखलीतील रुपीनगर परिसरात घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात तरुणाने घरात प्रवेश करत आलमारीतील ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास रुपीनगर  येथे घडली.

या प्रकरणी गुल्लू तोफिक शेख (वय ३९ रुपीनगर, चिखली, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, घटनेच्या वेळी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. याच संधीचा फायदा घेत एका अज्ञात तरुणाने दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील आलमारीमध्ये ठेवलेली ३० हजार रुपयांची रोकड फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेली, असा आरोप आहे.

फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार, संशयित तरुणाचे वय अंदाजे २२ ते २३ वर्षे असून, त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली होती. त्याच्या शर्टाची एक बाही लाल रंगाची, तर दुसरी बाही पांढऱ्या रंगाची होती. तसेच संशयिताचे केस वाढलेले व कुरळे असून, दाढी वाढलेली आहे. त्याची उंची अंदाजे पाच फूट असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन आरोपीला अटक केली असून शुभम उर्फ चिम्या शिवदास पवार असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories