वाकडमध्ये लहानग्या दोन सख्ख्या बहिणींवर ६१ वर्षीय वृद्धाने केले लैंगिक अत्याचार, शहरभरात संताप

वाकडमध्ये लहानग्या दोन सख्ख्या बहिणींवर ६१ वर्षीय वृद्धाने केले लैंगिक अत्याचार, शहरभरात संताप

वाकडमध्ये लहानग्या दोन सख्ख्या बहिणींवर ६१ वर्षीय वृद्धाने केले लैंगिक अत्याचार, शहरभरात संताप 

पिंपरी, ता. २८ जुलै २०२६ -  वाकड परिसरात दहा व चार वर्षाच्या दोन सख्ख्या बहिणींवर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका ६१ वर्षांच्या नराधमाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तीव्र संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पिडीत बालिकांपैकी एका मुलीच्या पोटात वारंवार दुखू लागल्याने, तिच्या पालकांनी चौकशी केली असता नराधमाचे हे घाणेरडे कृत्य समोर आले. 

या घटनेबद्दल समजताच पिडीत बालिकांचे नातेवाईक आणि संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी वाकड पोलिस ठाण्यात प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनी त्या नराधमाला तातडीने (ता. २८) ताब्यात घेतले आहे. रमझान बागवान असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

६१ वर्षांचा हा नीच इसम मागील दीड ते दोन महिन्यांपासून या मुलींवर अत्याचार करत होता. अत्याचारानंतर तो मुलींना पोट कापायची धमकी द्यायचा. यामुळे दोघी मुली घाबरल्या होत्या. पिडीत मुलींचे कुटुंबीय तसेच आरोपीचे कुटुंब मजुरीचे काम करतात. घटनेच्या दिवशी घरातील सर्व लोक कामावर गेले होते. यावेळी चौथीतील १० वर्षांची मुलगी आणि तिची ४ वर्षांची लहान बहीण दोघीच घरी होत्या. हीच संधी साधून आरोपी रमझानने १० वर्षांच्या बालिकेला बळजबरीने स्वतःच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा सर्व प्रकार एका शेजारील महिलेने पाहिला होता. संध्याकाळी मुलीच्या पालकांनी घरी आल्यावर, त्या महिलेच्या सांगण्यावरून विचारपूस केली असता, मुलीने सर्वकाही सांगितले. आरोपीने मे महिन्यापासून आतापर्यंत १० वर्षांच्या बालिकेवर तब्बल चार वेळा अत्याचार केला होता. तिच्या ४ वर्षांच्या लहान बहिणीलाही घरात नेऊन तिच्यावर एकदा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे सबंध शहरात पुन्हा संताप व्यक्त केला जात आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories