अल्पवयीन गुन्हेगाराकडे सापडला 27 हजार रुपयांचा गांजा, वाल्हेकरवाडीमध्ये कारवाई

अल्पवयीन गुन्हेगाराकडे सापडला 27 हजार रुपयांचा गांजा, वाल्हेकरवाडीमध्ये कारवाई

अल्पवयीन गुन्हेगाराकडे सापडला 27 हजार रुपयांचा गांजा, वाल्हेकरवाडीमध्ये कारवाई 

पिंपरी, ता. १७ -  वाल्हेकरवाडी गावठाण येथे १५ जूनला अल्पवयीन गुन्हेगाराकडून २७ हजार रुपयांचा ५१६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन गुन्हेगारासह त्याला गांजा   देणाऱ्यावर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्याद पोलीस हवालदार अविनाश प्रकाश गायकवाड (नेमणूक चिंचवड पोलीस ठाणे) यांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १५ जून रोजी रात्री २०.४५ वाजण्याच्या सुमारास वाल्हेकरवाडी गावठाण परिसरातील रस्त्यालगत, इलेक्ट्रिक डीपीजवळ अल्पवयीन गुन्हेगाराकडून ५१६ ग्रॅम (किंमत  २७,००० रुपये) गांजा जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान संबंधित  अल्पवयीन गुन्हेगाराने हा गांजा दुसऱ्या आरोपीकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories