मौजे खराबवाडीमध्ये विनापरवाना गॅस टाक्यांची वाहतूक,  टॅम्पोसह २ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

मौजे खराबवाडीमध्ये विनापरवाना गॅस टाक्यांची वाहतूक, टॅम्पोसह २ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

मौजे खराबवाडीमध्ये विनापरवाना गॅस टाक्यांची वाहतूक,  टॅम्पोसह २ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी, ता. १७ - खेड तालुक्यातील मौज खराबवाडी परिसरात कमर्शियल गॅसच्या टाक्यांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ३० वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत गॅस टाक्या आणि टॅम्पो असा एकूण  २ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत फिर्याद पोलीस शिपाई राजेंद्र परमेश्वर खेडकर (नेमणूक दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे) यांनी दिली आहे. आरोपीचे नाव शेखर किशोर भोरे (वय ३०, रा. पवणी पार्क, फ्लॅट नं. ए-७०२, खराबवाडी, ता. खेड; मूळ रा.  दक्षिण सोलापूर) असे आहे.

दिनांक १६ जून रोजी पहाटे १.१५ वाजण्याच्या सुमारास हिंगणे चौक ते सारासिटी जाणाऱ्या रस्त्यावर, फातिमा चिकन सेंटरसमोर आरोपी टॅम्पोमधून सहा कमर्शियल गॅस टाक्यांची विनापरवाना वाहतूक करताना आढळून आला.

या कारवाईत सुमारे १९,२०० रुपये किमतीच्या गॅस टाक्या आणि २,५०,००० रुपये किमतीचा टॅम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात   बीएनएस कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories