गॅस गळतीमुळे वाकडमधील बिर्याणी हाऊसला लागलेल्या आगीत १९ वर्षीय कामगाराचा मृत्यू, दोघे जखमी

गॅस गळतीमुळे वाकडमधील बिर्याणी हाऊसला लागलेल्या आगीत १९ वर्षीय कामगाराचा मृत्यू, दोघे जखमी

गॅस गळतीमुळे वाकडमधील बिर्याणी हाऊसला लागलेल्या आगीत १९ वर्षीय कामगाराचा मृत्यू, दोघे जखमी

पिंपरी, ता. ३ ऑगस्ट २०२६ -  वाकड-डांगे चौक रस्त्यावरील 'न्यू दिल्ली ६ बिर्याणी हाऊस'मध्ये रविवारी (ता. २) रात्री व्यावसायिक गॅस सिलिंडर बदलताना अचानक झालेल्या गळतीमुळे भीषण आग लागली. या  दुर्घटनेत एका १९ वर्षीय कर्मचारी शहजाद शेख याचा धुरामुळे गुदमरून आणि गंभीर भाजून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. 

 वाकड येथील सुखवानी सिटी संकुलात 'नवी दिल्ली ६ बिर्याणी हाऊस' आहे. रविवारी रात्री हॉटेलमधील गॅस संपल्याने नवीन सिलिंडर जोडण्याचे काम सुरू होते. मात्र, त्याच वेळी शेजारीच असलेली हॉटेलची मुख्य भट्टी देखील सुरु होती. सिलिंडर जोडत असताना अचानक गॅसची मोठी गळती झाली आणि भट्टीच्या संपर्कात येताच आगीचा प्रचंड भडका उडाला.

आगीची ठिणगी पडताच सिलिंडर जोडणारा कर्मचारी प्रसंगावधान राखून  बाहेर पळाला. मात्र, तिथेच काम करत असलेला १९ वर्षांचा तरुण शहजाद शेख (मूळ रा. उत्तर प्रदेश) हा आगीच्या वेढ्यात आणि धुराच्या लोटात आतच अडकून पडला. आगीच्या भीषण धुरामुळे शहजादचा श्वास गुदमरला आणि तो गंभीर भाजला गेला. त्याला त्या  अवस्थेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नेण्यात आले. परंतु  उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी ५ ते ६ सिलिंडर सुरक्षित बाहेर काढून तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. हॉटेलचे मालक मोहम्मद उस्मान (वय ३८, सध्या तळेगाव, मूळ फरिदाबाद, हरियाणा) यांनी हे हॉटेल फरहान (वय ३५) व त्याचा भाऊ शेहजाद शेख यांच्याकडे चालविण्यास दिले होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. प्रशासनाकडून अधिक चौकशी सुरू आहे



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories