पिंपरी-चिंचवड महापालिकेत इंदिरा गांधी यांची जयंती साजरी ; महापौरांचे अभिवादन

पिंपरी-चिंचवड महापालिकेत इंदिरा गांधी यांची जयंती साजरी ; महापौरांचे अभिवादन

पिंपरी : भारताच्या माजी पंतप्रधान आणि भारतरत्न दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी (19 नोव्हेंबर) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  महापौर रवि लांडगे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच उपस्थित महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ घेतली.

या कार्यक्रमाला उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता जाहिरा मोमीन, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा जपण्याची शपथ घेतली. "आम्ही हिंसाचाराचा कधीही अवलंब करणार नाही. धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे तसेच राजकीय व आर्थिक गा-हाणी ही शांततामय आणि सांविधनिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवू" असा संकल्प करण्यात आला.

जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या शपथेचे वाचन केले. यावेळी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत शपथेचे सामूहिक वाचन केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories