जंजिरा किल्लादर्शन २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत जलप्रवासासाठी बंद ठेवण्याचे आदेश

जंजिरा किल्लादर्शन २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत जलप्रवासासाठी बंद ठेवण्याचे आदेश

जंजिरा किल्लादर्शन २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत जलप्रवासासाठी बंद ठेवण्याचे आदेश

पुणे, ता. २० - मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्लादर्शन २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत जलप्रवासासाठी बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा यांनी दिले आहेत. पावसामुळे समुद्रात वाढणाऱ्या वादळी वाऱ्यांचा वेग, उंच लाटा आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून मेरिटाइम बोर्डाने किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


पावसाळ्याची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता, मालवण बंदर क्षेत्रात २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंतपासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. या पावसाळी सिंधुदुर्ग किल्लाही प्रवासी वाहतूक, सर्व प्रकारच्या जलक्रीडा आणि नौकाविहार, स्कूबा डायव्हिंग या बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जंजिरा किल्ला प्रत्यक्ष पाहणे तीन महिने बंद राहणार असल्याने पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून १० मे रोजी १११ कोटी रुपये खर्चून किल्ल्याच्या पश्चिम दिशेस ५०० मीटर लांबीच्या भव्य जेट्टीचा लोकार्पण सोहळा मंत्री नितेश राणे व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे आता जंजिऱ्याचे प्रवेशद्वार किंवा जेट्टीच्या सहाय्याने किल्ला पाहणे शक्य होणार आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories