पुणे शहर आणि परिसरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खेड तालुक्यातील मुऱ्हेवस्ती कुरळी परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या दुचाकीची किंमत सुमारे 30 हजार रुपये आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुदाम मारुती मुऱ्हे (वय 78, रा. मुऱ्हेवस्ती कुरळी) यांनी ही तक्रार नोंदवली आहे. फिर्यादीनुसार मुऱ्हे यांनी आपली काळ्या रंगाची व लाल पट्टी असलेली हिरो डिलक्स मोटारसायकल MH 14 GW 7470 ही घरासमोर हँडल लॉक करून पार्क केली होती. मात्र, 3 नोव्हेंबरच्या रात्री 11 नंतर ते 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजेपर्यंतच्या कालावधीत बाईक चोरीला गेली. एका अज्ञात चोरट्याने मोटारसायकलचे लॉक तोडून ती चोरून नेली. सकाळी 4 नोव्हेंबर रोजी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सुदाम यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
3 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 11 ते 4 च्या सुमारास अज्ञात चोरट्याने मोटारसायकलचे लॉक तोडून ती चोरून नेली. एका अज्ञात चोरट्याने मोटारसायकलचे लॉक तोडून ती चोरून नेली. बुधवारी (4 नोव्हेंबर) सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सुदाम यांनी पोलिसांत धाव या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
संबंधित दुचाकी घरासमोर पार्क केलेली असताना चोरट्याने संधी साधून ती लंपास केली. यामुळे सुदाम मुऱ्हे यांचे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS)2023 च्या कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटारसायकल चोरी करणारा अज्ञात चोरटा असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रोंगडे करीत आहेत.