news
clock

एलपीजी सिलिंडर पोहोचवणाऱ्या वाहनांना पोलिस संरक्षण मिळणार 

गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करणार

पिंपरी, ता. १४ - आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतातील एलपीजी गॅस सिलिंडरची उपलब्धता व पुरवठा यात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सांगितली जात आहे. म्हणून, महाराष्ट् राज्य सरकार गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी संबंधित संस्थांना राज्यभरात एलपीजीचा पुरवठा निश्चित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, एलपीजी सिलिंडर पोहोचवणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण दिले जाणार आहे. 

गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना अशा - 

-  एलपीजी सिलिंडर पोहोचवणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण दिले जाणार

-  राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार. हे नियंत्रण कक्ष     नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करतील आणि गॅस पुरवठ्याबाबत तात्काळ माहिती देतील. 

-  जनतेच्या सोयीसाठी व्हॉट्सअप देखील सुरु केले जाईल. 

-  गॅस पुरवठ्यातील अडथळे दूर करण्यासाठी जिल्हा पातळीवर विशेष समित्या स्थापन होणार

    या समित्यांमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सरकारी गॅस    कंपन्यांचे अधिकारी यांचा समावेश असेल.

-  पेट्रोल बुकिंग अॅप आणि मिस्ड कॉल सेवांमध्ये येणाऱ्या तांत्रिक समस्या त्वरित सोडवण्याचे तेल कंपन्यांना   निर्देश



महाराष्ट्र, LPG सिलिंडर, LPG Cylinder, गॅस पुरवठा, Gas Supply, एलपीजी वितरण, LPG Distribution, पोलीस संरक्षण, Police Protection, गॅस डिलिव्हरी वाहन, Gas Delivery Vehicles, राज्य सरकार, State Government, अन्न नागरी पुरवठा विभाग, Food and Civil Supplies Department, ग्राहक संरक्षण, Consumer Protection, अनिल डिग्गीकर, Anil Diggikar, आखाती देश युद्ध, Gulf War Impact, गॅस तुटवडा, Gas Shortage, नियंत्रण कक्ष, Control Room, जिल्हा प्रशासन, District Administration, जिल्हाधिकारी, District Collector, पोलीस अधीक्षक, Superintendent of Police, जिल्हा पुरवठा अधिकारी, District Supply Officer, गॅस कंपन्या, Gas Companies, व्हॉट्सअ‍ॅप सेवा, WhatsApp Service, पेट्रोल बुकिंग अॅप, Petrol Booking App, मिस्ड कॉल सेवा, Missed Call Service, महाराष्ट्र


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories