news
clock
'एक राष्ट्र, एक‌ ई-चलन' प्रकल्प अंमलबजावणीला राज्यसरकारची मंजुरी

'एक राष्ट्र, एक‌ ई-चलन' प्रकल्प अंमलबजावणीला राज्यसरकारची मंजुरी

'एक राष्ट्र, एक‌ ई-चलन'प्रकल्पाच्या अंमलबजावणीला राज्यसरकारची मंजुरी

पुणे, ता. 30 -  वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी 'एक राष्ट्र, एक ई-चलन' प्रकल्पाच्या अंमलबजावणीला राज्यसरकारने मंजुरी दिली आहे. याबाबतचा निर्णय गृह विभागाने जारी केला आहे.

 'एक राष्ट्र, एक ई-चलन' ही योजना सुरुवातीला मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर  सुरु करण्यात आली होती. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी झाल्यानंतर आता  संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ई-चलन प्रणालीमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पारदर्शकपणे तात्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे. त्यामुळे, रस्त्यांच्या सुरक्षिततेत वाढ होऊन अपघातांना प्रतिबंध बसेल. याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

'एक राष्ट्र, एक ई-चलन' प्रकल्पासाठी १९.३५ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories