पवना धरण ७९ टक्के भरले, मात्र..शहरातील १५ टक्के पाणी कपात सुरुच राहणार
पिंपरी, ता. २० जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण ७९ टक्के भरले आहे. मात्र, धरण १०० टक्के भरले नाही तर सध्या सुरु असलेली १५ टक्के पाणी कपात सुरूच राहणार आहे. याबाबतचा निर्णय महापालिका प्रशासनाने जाहीर केला आहे.
पवना धरणात गुरुवार, १६ जुलै अखेर एकूण जलसाठा ७६.४८ टक्के झाला होता. यात उपयुक्त पाणीसाठा ७५.९७ टक्के आहे. यंदा मान्सूनला विलंब झाल्याने बहुतांश धरणांनी तळ गाठले होते. जूनमध्ये पवना धरणात १८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे त्यामुळे जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार महापालिकेने १९ जूनपासून पाणी कपात लागू केली. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढतच होत्या. जुलै महिन्याच्या सुरुवातीला शहरात दमदार पाऊस पडला. पवना धरणातील पाणीसाठ्यात ४ जुलैपर्यंत २७.६२ टक्के पाणीसाठा झाला होता. ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला. आता १६ जुलैअखेर पवना धरणातील पाणीसाठा ७६.४८ टक्के झाला आणि सोमवारपर्यंत धरण ७९ टक्के भरले आहे.
पुढेही एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवून सुरू असलेली पाणी कपात कायम ठेवावी, अशी सूचना केली आहे. याबाबत, बोलताना महापालिकेचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी म्हणाले की, ''शहरात सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात कायम ठेवण्यात येणार आहे. धरण १०० टक्के भरले नाही तर ती आणखी दोन महिने असणार आहे. धरण भरल्यास कपात मागे घेतली जाणार आहे. ''
- Dam Water Storage, ७९ टक्के जलसाठा, 79 Percent Storage, पाणी वितरण, Water Distribution
- पाणीटंचाई, Water Scarcity, मान्सून, Monsoon, पाऊस, Rainfall, मुसळधार पाऊस, Heavy Rain
- पाणीपुरवठा, Water Supply, जलसाठा, Water Storage, धरण, Dam
- पाणी कपात, Water Cut, १५ टक्के पाणी कपात, 15 Percent Water Cut
- पवना धरण, Pavana Dam, पिंपरी, Pimpri