'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार - 2025' मध्ये महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी, राज्यातील ४ ग्रामपंचायतींना पुरस्कार

पुणे, ता. ४ - केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाकडून देशपातळीवर देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने उत्तम यश मिळवले आहे.  केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा नुकताच नवी दिल्ली येथे पार पडला. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह, केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल तसेच आसाम सरकारचे मंत्री रामेश्वर तेली यांच्या हस्ते विविध श्रेणींतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजेत्या ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले आहे. 

महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे :-

🏆बालस्नेही पंचायत - इटगाव (पु) (जि. भंडारा)- देशात प्रथम क्रमांक 

🏆जल-समृद्ध पंचायत - खारीवली (ता. खालापूर, रायगड) - देशात प्रथम क्रमांक 

🏆सामाजिकदृष्ट्या न्याय्य आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित पंचायत - चांभारली (खालापूर, रायगड)- देशात द्वितीय क्रमांक 

🏆सुशासन ग्रामपंचायत श्रेणी - निंबाळे (चांदवड, नाशिक) - देशात द्वितीय क्रमांक 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories