राज्यभरात ३० जून ते ६ जुलैपर्यंत चांगला पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यभरात ३० जून ते ६ जुलैपर्यंत चांगला पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यभरात ३० जून ते ६ जुलैपर्यंत चांगला पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज 

पुणे, ता. १ - महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा (Off-shore trough) सक्रिय आहे. ३० जून ते ६ जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात चांगला पाऊस पडेल,  काही भागात अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने ३० जूनला सांगितला आहे. त्यानुसार, नागरिकांना सतर्क राहण्याचे व प्रवासाला निघताना वाहतूक कोंडीची स्थिती पाहण्याचे, घाट रस्त्यांवर दरड कोसळण्यी शक्यता असल्याने काळजी घेण्याचे,  मच्छिमारांना सुमद्रात न जाण्याचे आवाहन राज्य सरकाराने केले आहे. शेतकऱ्यांना आपले पशुधन गोठ्यांत सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

दिनांक ३० जून ते ६ जुलैपर्यंत भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे -


- प्रादेशिक पाऊस अंदाज 

- कोकण - बहुतांश ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता.

- मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी ते बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज.

- विदर्भ - जवळजवळ सर्वच भागात व्यापक पावसाची शक्यता.

- मराठवाडा - २ आणि ३ जुलै रोजी पावसाचा जोर वाढेल, इतर दिवशी तुरलक पाऊस.


- तीव्र हवामानाचा इशारा (रेड/ऑरेंज अलर्ट)

- अतिवृष्टी -  २ ते ४ जुलै दरम्यान कोकणात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा.

- घाट माथा - २ आणि ३ जुलै रोजी मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात अत्यंत मुसळधार पावसाची (Extremely Heav Rain) शक्यता.

- मध्य महाराष्ट्र - ४ ते ६ जुलै दरम्यान काही भागात अतिवृष्टीचा अंदाज.

- विजांचा कडकडाट - मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ३० जून ते ४ जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता.


- संभाव्य परिणाम आणि नागरिकांना आवाहन

- पूरसदृश स्थिती - सखल भागात पाणी सावण्याची आणि शहरी भागातील रस्ते जलमय होण्याची शक्यता

- भूस्खलन - घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याचा (Landslides) मोठा धोका आहे. 

- प्रवास काळजी - प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची माहिती तपासून घ्या.

- मच्छीमार - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या खराब हवामानामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये.


- शेतीविषयक सल्ला (Agromet Advisory)

- पाण्याचा निचरा - भात शेती आणि भाजीपाल्याच्या रोपवाटिकांमधून अतिरिक्त पाणी त्वरित बाहेर काढावे. 

- पशुधन - मुसळधार पावसाच्या वेळी जनावरांना गोठ्यात सुरक्षित ठेवावे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories