अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
पिंपरी, ता. १३ ऑगस्ट २०२६ - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार (ASDD - Absent, Shifted, Dead and Duplicate) मतदारांची यादी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्व मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाला भेट देऊन सदर ए.एस.डी.डी. यादीतील नाव तपासावे. चुकीने एखाद्या मतदाराचे नाव अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार मतदारांची यादीमध्ये समाविष्ट झाले असल्यास त्याच संकेतस्थळार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे (बीएलओ) नाव व संपर्क क्रमांकाची यादी देण्यात आलेली आहे.
संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. म्हणजे संबंधित मतदाराचे नाव अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार यादीतून वगळून मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
- ASDD Voter List Published on Pune Collector Website
- मतदार नाव तपासणी, Voter Name Verification
- Special Intensive Revision, SIR, भारत निवडणूक आयोग, Election Commission of India
- Voter Roll, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण
- अनुपस्थित मतदार, Absent Voters, स्थलांतरित मतदार, Migrated Voters, मयत मतदार, Deceased Voters, दुबार मतदार, Duplicate Voters, ASDD Voters