मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगार नागेश गायकवाड यांच्या पत्नीची आत्महत्या

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगार नागेश गायकवाड यांच्या पत्नीची आत्महत्या

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगार नागेश गायकवाड यांच्या पत्नीची आत्महत्या 

पिंपरी, ता. १३ ऑगस्ट २०२६ - गेल्या महिन्यात मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेत ९ कामगारांपैकी नागेश  सर्जेराव गायकवाड (वय २६ वर्षे) यांचा मृ्त्यू झाला. 

या घटनेला आत्ताच महिना पूर्ण झालाय तोवर मृत गायकवाड यांची पत्नी सोनाली गायकवाड (वय २३) यांनी बुधवारी (ता. १२) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या पती-पत्नीच्या निधनामुळे त्यांच्या दोन मुली आता पोरक्या झाल्या आहेत.  

मृत नागेश-सोनाली यांना श्रेया (वय ४ वर्ष) आणि  प्रिया (दीड वर्ष) या दोन मुली आहेत. मुली, आई-वडील आणि मोठा भाऊ स्वप्नील असा त्यांचा परिवार आहे. मुलींना मोठं करण्याची स्वप्न घेऊन गायकवाड दांपत्याचा संसार सुरु होता. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत पती नागेश यांचा मृत्यू झाल्याने सोनाली टेन्शनमध्ये होत्या. पतीचा विरह सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली, असा पोलिसांचा अंदाज आहे.  

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गायकवाड दांपत्याच्या लहानग्या मुली पोरक्या झाल्याने मोशी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories