पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन बोधचिन्हास स्थायी समितीची मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन बोधचिन्हास स्थायी समितीची मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन बोधचिन्हास स्थायी समितीची मंजुरी

पिंपरी, ता. १३ ऑगस्ट २०२६ - महानगरपालिकेच्या अधिकृत बोधचिन्हाबाबत (Logo) एक अत्यंत महत्त्वपूर्ण  निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या आगामी बोधचिन्हामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ प्रतिमेचा आणि 'कटिबद्ध जनहिताय' या प्रेरणादायी ब्रीदवाक्याचा अधिकृतपणे समावेश करण्यात आला असून, या महत्त्वपूर्ण विषयास स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी या विषयास मंजुरी दिली आहे.

या संदर्भातील प्रशासनाच्या ठरावानुसार, महानगरपालिकेच्या नवीन म्युरल किंवा बोधचिन्हाचा अंतिम नमुना मान्य करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व राजसत्तेच्या लोककल्याणकारी मूल्यांचा आदर्श समोर ठेवून या बोधचिन्हाची रचना करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने जनहिताची कामे करताना हे बोधचिन्ह व त्यावरील 'कटिबद्ध जनहिताय' हा संदेश प्रशासकीय व सामाजिक बांधिलकीची साक्ष देणार आहे.

हा अंतिम नमुना मान्य झाल्यानंतर, आता आवश्यकतेनुसार योग्य आकारमानात महानगरपालिकेच्या सर्व मुख्यालयामध्ये, तसेच विविध विभागांच्या इमारतींमध्ये दर्शनी ठिकाणी हा बोधचिन्ह फलक लावण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील पुढील सर्व आवश्यक प्रशासकीय कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यास प्रशासकीय पातळीवर मान्यता प्रदान करण्यात आली आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories