पीसीएमसी मेट्रो स्टेशन येथे नवीन शेअर रिक्षा स्टँडचा प्रारंभ, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा पुढाकार
पीसीएमसी मेट्रो स्टेशन येथे नवीन शेअर रिक्षा स्टँडचा प्रारंभ, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा पुढाकार
पिंपरी, ता. १३ ऑगस्ट २०२६ - महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने पीसीएमसी मेट्रो स्टेशन येथे नवीन शेअर रिक्षा स्टँडचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी विशेष मार्गदर्शक फलकाचे अनावरण करण्यात आले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी रिक्षाचालकांना मार्गदर्शन केले. "संघटनेचा फलक म्हणजे शिस्त, संघटनेच्या फलकावरील सेवा आणि रिक्षा स्टँड हेच खरे समाजसेवा केंद्र आहे. रिक्षाचालकांनी शिस्त, सेवा आणि समर्पित भावनेने प्रवाशांना सेवा द्यावी.", असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे युवक अध्यक्ष शुभम तांदळे, निगडी ते दापोडी विभाग शेअर रिक्षा कार्याध्यक्ष सचिन म्हात्रे, उपाध्यक्ष गणेश कुमार आणि खजिनदार अनिल गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्टँड अध्यक्ष रोहन जोगदंड, उपाध्यक्ष महेश शिंदे, कार्याध्यक्ष अमित चव्हाण, सचिव प्रेम हनवते, सहसचिव तनवीर कुरेशी, खजिनादार ऋतिक वाघमारे, तसेच उपाध्यक्ष अनिल पवार, चंद्रदीप डोलारे आणि शाकीर सय्यद यांनी परिश्रम घेतले.
शेअर रिक्षा स्टँडबाबत महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने दिलेली माहिती...
- प्रवाशांची गैरसोय टळणार : पीसीएमसी मेट्रो स्टेशनवर उतरणाऱ्या नागरिकांना घरी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा हे एकमेव प्रभावी साधन आहे. मात्र, काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, भाडे नाकारणे (Refuse करणे) किंवा जादा भाडे आकारणे असे प्रकार घडतात. यामुळे प्रवासी ओला, उबर किंवा इतर साधनांचा पर्याय निवडतात. हे सर्व थांबवण्यासाठी आता या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने मीटर आणि शेअर रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे.
- शेअर रिक्षा सेवा : मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी एकाच रिक्षामध्ये तीन प्रवासी घेऊन शेअरिंग पद्धतीने ही सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे
- डॉ. बाबा कांबळे, Dr. Baba Kamble, शुभम तांदळे, Shubham Tandale, सचिन म्हात्रे, Sachin Mhatre, गणेश कुमार, Ganesh Kumar, अनिल गायकवाड, Anil Gaikwad, रोहन जोगदंड, Rohan Jogdand
- शेअर रिक्षा सेवा, Share Rickshaw Service
- पीसीएमसी मेट्रो स्टेशन, PCMC Metro Station, शेअर रिक्षा स्टँड, Share Rickshaw Stand
- महाराष्ट्र रिक्षा पंचायत, Maharashtra Rickshaw Panchayat