पुणे मेट्रो आणि पीएमपीएमएलची संयुक्त आढावा बैठक संपन्न

पुणे मेट्रो आणि पीएमपीएमएलची संयुक्त आढावा बैठक संपन्न

पुणे मेट्रो आणि पीएमपीएमएलची संयुक्त आढावा बैठक 

पुणे, ता. १३ - पुणे मेट्रो भवन येथे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर व पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रो व पीएमपीएमएलची संयुक्त आढावा बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत नवीन फीडर मार्ग विकसित करणे, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे, फीडरची वारंवारिता वाढवणे तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी ‘One Journey, One Ticket’ संकल्पना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.  नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि अखंड सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

यावेळी पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील, पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक श्रीमती ॲलिस पोरे, चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर यशवंत हिंगे तसेच महामेट्रो, पुणे मेट्रो व पीएमपीएमलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‍ 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories