''दारुचे अवैध उद्योग कायमस्वरुपी बंद झाले पाहिजेत.'' - केंद्रिय मंत्री रामदास आठवले
Jun 01 2026
19
''दारुचे अवैध उद्योग कायमस्वरुपी बंद झाले पाहिजेत.'' - केंद्रिय मंत्री रामदास आठवले
पिंपरी, ता. १ - पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी व पुणे परिसरात हातभट्टीची विषारी दारु पिल्याने अनेक नागरीक मरण पावले. त्यांच्या कुटुंबियांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (ता. ३१) भेट घेतली. ''मृतांच्या कुटुंबातील व्यक्तींना रोजगार देण्यासाठी मी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांशी चर्चा केली आहे.'', असे त्यांनी सांगितले. ''दारुचे अवैध उद्योग कायमस्वरुपी बंद झाले पाहिजेत.'', असे आठवले म्हणाले.
यावेळी आठवले त्यांच्यासोबत पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, डॉ. धम्मरत्न गायकवाड उपस्थित होते.
आठवले म्हणाले, ''विषारी दारुमुळे लोक मृत्यूमुखी पडल्याच्या घटना या आधी देशभरात घडल्या आहेत. दारुच्या या अवैध धद्यांवर पोलिस कारवाई करतात पण पुन्हा ते सुरु होतात. त्यामुळे, दारुचे अवैध उद्योग कायमस्वरुपी बंद करण्याची गरज आहे.'' ''फुगेवाडीतील या प्रकरणाची राज्य सरकारने मुळाशी जाऊन सखोल चौकशी करावी. या प्रकरणातील पिडीत कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. '' असे आठवले म्हणाले.
- , Victim Families, पिडीत कुटुंबे, Employment Support, रोजगार मदत, Social Justice Ministry,
- visit fugewadi and demand
- राज्य सरकार चौकशी, Strict Action Against Culprits, दोषींवर कठोर कारवाई, Illicit Alcohol Trade,
- Illegal Liquor, अवैध दारू उद्योग, Hand Bhatti Liquor, हातभट्टी दारू,
- Minister Ramdas Athawale, रामदास आठवले