news
clock
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला 'युद्ध नको, बुद्ध हवा' हा संदेश जगासाठी आशेचा किरण -  रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला 'युद्ध नको, बुद्ध हवा' हा संदेश जगासाठी आशेचा किरण - रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला 'युद्ध नको, बुद्ध हवा' हा संदेश जगासाठी आशेचा किरण -  रामदास आठवले

दुसऱ्या पाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन 

पुणे, ता. २५ - ''२१ व्या शतकात तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे. तर दुसऱ्या बाजूला विविध देशांमधील वाढत्या संघर्षामुळे मानवतेसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला 'युद्ध नको, बुद्ध हवा' हा संदेश आज जगासाठी आशेचा किरण ठरला आहे.'', असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली व बौद्ध अध्ययन विभाग यांच्या वतीने रविवार (ता. २२) आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या पाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे विभागप्रमुख डॉ. महेश देवकर यांना 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. 

आठवले म्हणाले, ''पाली भाषेने जगाला ज्ञान प्रदान केले आहे. विज्ञानवाद समानता, मानवता आणि शांततेचे ज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान पाली भाषेतूनच जगभरात पोहोचले आहे.  पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा यासाठी शासकीय पातळीवरुन निश्चितपणे मदती केली जाईल.'' 

 यावेळी संमेलनाध्यक्ष बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या पाली विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बिमलेंद्र कुमार, गगन मलिक, भदन्त हर्षबोधी महाथेरो, डॉ. योजना भगत, उपमहापौर परशुराम वाडेकर, धम्मदीप वानखेडे, डॉ. करुणा जाधव, डॉ. नीरज बोधी, सारंग आव्हाड, स्वागताध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे, डॉ. गौतम

चाबूकस्वार, संयोजक राहुल डंबाळे, सुवर्ण डंबाळे आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे उपस्थित होते. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories