महानगरपालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज् फाउंडेशनतर्फे विनाशुल्क कौशल्य प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पिंपरी, ७ ऑगस्ट २०२६ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज् फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'कौशल्यम' प्रकल्पांतर्गत विनाशुल्क कौशल्य प्रशिक्षण वर्ग ११ ऑगस्ट २०२६ पासून आयोजित केले आहेत. 18 ते 35 वयोगटातील युवक-युवती यामध्ये सहभागी होऊ शकतील.
या प्रशिक्षणासाठी प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी लिंक https://docs.google.com/.../1FAIpQLScih6qYpctv.../viewform ही आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणाबरोबरच मुलाखतीची तयारी, व्यक्तिमत्व विकास याबाबतही मार्गदर्शन केले जाईल व त्वरीत नोकरीची संधीही उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
प्रशिक्षण सत्र सकाळी 10:00, दुपारी 12:00 आणि दुपारी 2:00 या तीन टप्प्यांत असेल. ज्या युवक-युवतींनी यापूर्वी लाईटहाऊसमधून कोणताही कोर्स पूर्ण केला आहे किंवा सध्या कोर्स करत आहेत, त्यांनी कृपया पुन्हा नोंदणी करू नये, अशी सूचना आहे.
कौशल्य प्रशिक्षणांमध्ये डेटा अॅनालिस्ट, ऑफीस एक्झिक्युटिव्ह, अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, ग्राफिक डिझायनिंग, डिजीटल मार्केटिंग, अर्ली चाइल्डहूड केअर एज्युकेशन डिप्लोमा म्हणजे प्री स्कूल टिचर, सीएनसी ऑपरेटर, पीएसीबी असेम्बली ऑपरेटर, फ्रिज अॅण्ड एसी मेकॅनिक, इल्केक्ट्रिशियन, ऑटोमोबाईल स्प्रे पेंटिंग (महिलांसाठी), लॉजिस्टिक्स, बॅंकिंग अॅण्ड फायनान्स, जनरल ड्युटी असिस्टंट, रिटेल स्टोअर ऑपरेशन्स, ईव्ही टेक्निशियन, मोबाईल रिपेअरिंग आणि एचआर व पे रोल.....ही प्रशिक्षणे उपलब्ध आहेत.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क -
लाईटहाऊस : 8956868168, 8788012863
📍 पत्ता: पिंपरी लाईटहाऊस, दुसरा मजला,
सावित्रीबाई फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी.
किवर्ड्स विथ कॉमा मराठी इंग्रजी एकत्र