कॉक्रोच जनता पार्टीकडून 'क्या बोलती पब्लिक' या देशव्यापी अभियानाची घोषणा, पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीही जाहीर
कॉक्रोच जनता पार्टीकडून 'क्या बोलती पब्लिक' या देशव्यापी अभियानाची घोषणा, पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीही जाहीर
पिंपरी, ७ ऑगस्ट २०२६ - कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) कोअर कमिटीची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्थापक-अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी बुधवारी (ता. ५) व गुरुवारी (ता. ६) पार पडली.
बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके यांनी पक्षाच्या आगामी भूमिका आणि कार्यक्रमांची माहिती दिली. सप्टेंबर महिन्यात 'क्या बोलती पब्लिक' या नावाने देशव्यापी अभियान सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा दीपके यांनी केली.
'क्या बोलती पब्लिक' या अभियानामध्ये देशभर दौरा करून नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेणार असल्याचे दीपके यांनी सांगितले. ते म्हणाले, ''कॉक्रोच जनता पार्टी धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर विश्वास ठेवते. पक्षाची विचारधारा ही भारतीय राज्यघटनेच्या विचारांवर आधारित असून पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाहिलेल्या भारताच्या स्वप्नाला अनुसरून काम करणार आहे. बेरोजगारी, शिक्षण, संस्थांची जबाबदारी आणि नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून पक्ष काम करणार आहे.'' कॉक्रोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
कार्यकारिणी अशी.....
संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक : अभिजीत दिपके
सह संयोजक : आशुतोष रांका, सौरव दास
राष्ट्रीय संघटना प्रभारी :अजिंक्य शिंदे
संघटना सह प्रभारी : दीपक बलियान
राष्ट्रीय सचिव : अफ्रीन नवाज
मीडिया प्रमुख : विजय रेड्ड मलंगी
कायदेविषयक घडामोडी प्रमुख : रत्ना सिंग
रिसर्च अँड पॉलिसी लीड : वैष्णवी गौर
टेक्नोलॉजी लीड : रोहन देशपांडे
फायनान्स लीड : योगेश इंगळे
विभागीय प्रमुख
उत्तर विभाग : दीपक बलियान
दक्षिण विभाग : विजय रेड्डी मलंगी
पूर्व आणि ईशान विभाग : अंकित भारद्वाज
पश्चिम विभाग : योगेश इंगळे