'भाजप'च्या पिंपरी-चिंचवड शहर मुख्य प्रवक्तेपदी राज दुर्गे यांची नियुक्ती
पिंपरी, ७ ऑगस्ट २०२६ - भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर मुख्य प्रवक्ते पदी राज दुर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते दुर्गे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
दुर्गे यांचे पक्षातील आजपर्यंतचे सेवाभावी कार्य पहाता आपल्याला त्यांना पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांनी जनतेच्या प्रगती व कल्याणकरिता सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यरत राहावे तसेच ते भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडतील, असा विश्वास काटे यांनी नियुक्तीपत्रात व्यक्त केला आहे.
''पक्षात पिंपरी-चिंचवडच्या मुख्य प्रवक्ते पदी आपण माझी नियुक्ती करून माझ्यावर जो विश्वास दाखवलात त्याबद्दल आपले मनापासून खुप खुप आभार ! आपण दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रामाणिक पणे प्रयत्न करीन आणि पक्षाच्या प्रति आपण मला दिलेल्या जबाबदारीला मी नक्कीच न्याय देईन. '', अशी भावना दुर्गे यांनी व्यक्त केली आहे.