सोनिगरा परिवारातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०६ जणांचे रक्तदान
पिंपरी, ७ ऑगस्ट २०२६ - पनराजजी पुखराजजी सोनिगरा फाउंडेशन, श्री सोनिगरा डेव्हलपर्स आणि दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. पनराजजी पुखराजजी सोनिगरा यांच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (ता. ६) आयोजित रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चिंचवड येथील 'सोनिगरा - द मार्क' साईट येथे मोरया मल्टिस्पेशलिटी चॅरिटेबल हॉस्पिटल चे जनकल्याण रक्तपेढी पुणे, यांच्या विशेष सहकार्याने सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत हा उपक्रम पार पडला. शिबिरात एकूण १०६ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सहभागी सर्व रक्तदात्यांना अधिकृत सहभागिता प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच १७८ जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आणि ४५ जणांची ईसीजी (ECG) तपासणी करण्यात आली.
हे शिबिर स्व. पनराजजी पुखराजजी सोनिगरा यांचे सुपुत्र दिलीप सोनिगरा, जितेंन्द्र सोनिगरा, प्रवीण सोनिगरा, अरविंद सोनिगरा, आणि समस्त सोनिगरा परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. रमेश कांबळे, मोरया हॉस्पिटलचे डॉ. वाचकसुंदर अविनाश आणि समाजसेवक संजय कुलकर्णी हे उपस्थित होते. उपस्थितांनी सोनिगरा परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.