news
clock
उत्तर प्रदेशातील लोनी हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर

उत्तर प्रदेशातील लोनी हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर

उत्तर प्रदेशातील लोनी हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर 

पुणे, ता. २७ -  स्विस कंपनी आय-क्यू एअरने मंगळवारी (ता. २४)  सन - २०२५ चा 'वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट' प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, उत्तर प्रदेशातील गाजियाबादच्या बाहेरील लोनी हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे.

लोनी शहरात मध्ये २०२५ वर्षभरात सरासरी ११२.५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर PM2.5 कण आढळले. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ठेवलेल्या सुरक्षित मयदिपेक्षा (५ मायक्रोग्रॅम) २२ पटीने जास्त आहे.   लोनीच्या हवेतले धूळ, धूर आणि सूक्ष्म कण इतके घातक आहेत की ते थेट फुफ्फुसात आणि रक्तात शिरतात. लोनी व उत्तर भारतातील मोठ्या प्रदूषणाचा नागरीकांच्या अतिशय गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होत आहे. 

 PM2.5 सारखे सूक्ष्म कण फुफ्फुसात आणि थेट रक्तप्रवाहात शिरुन दमा, ब्रॉन्कायटिस, हृदयविकार, उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि कॅन्सरसारखे आजार होतात. लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांवर याचा सर्वाधिक परिणाम होतो, अशी माहिती तज्ज्ञांकडून दिली जाते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories