जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महापालिका वैद्यकीय विभागाकडून मातांना मार्गदर्शन

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महापालिका वैद्यकीय विभागाकडून मातांना मार्गदर्शन

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महापालिका वैद्यकीय विभागाकडून मातांना मार्गदर्शन 

पिंपरी, ७ ऑगस्ट २०२६ - दिनांक १ ते ७ ऑगस्ट हा आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह असतो. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जागृती अभियान राबवण्यात आले. 

वैद्यकीय विभागाच्या वतीने पिंपळे निलख येथील अंगणवाडी क्र. ३१ मध्ये, महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात, यमुनानगर रुग्णालयात,  वाल्हेकरवाडी दवाखान्यात अजमेरा मासुळकर कॉलनी येथील आयुष्यमान आरोग्य केंद्रात कार्यक्रम झाला. 

यावेळी, मातांना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ यांनी स्तनपानाचे महत्त्व, बाळाच्या सर्वांगीण विकासातील त्याची भूमिका, योग्य स्तनपान पद्धती, तसेच आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविषयी जागृतीही करण्यात आली. निरोगी आई, निरोगी बाळ आणि निरोगी समाजासाठी स्तनपान हा सर्वात प्रभावी पाया आहे. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपानाचे महत्त्व जाणून घेऊया आणि निरोगी पिढी घडवूया, असा संदेश वैद्यकीय विभागाकडून देण्यात आला.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories