मागून आलेल्या ट्रेलरची स्कूटीला धडक; मोशीत आई-मुलगा जखमी

मागून आलेल्या ट्रेलरची स्कूटीला धडक; मोशीत आई-मुलगा जखमी

मोशी | २८ नोव्हेंबर २०२६ : मोशीतील एका चौकात गुरुवारी रात्री स्कूटीचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूटी चालवणारी महिला गंभीर जखमी झाली, तर तिच्या मुलालाही किरकोळ मार लागला आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३५ च्या सुमारास मातेरे हाऊस चौकात हा अपघात झाला. राधा संजय जाधव या मुलगा केशव याच्यासह मोशीतील लक्ष्मी चौकातून इंद्रायणीनगरमार्गे भोसरीकडे जात होत्या. त्या स्कूटी चालवत होत्या. यावेळी चौकात मागून आलेल्या ट्रेलरने स्कूटीला धडक दिली. 

या धडकेत राधा यांच्या डाव्या हाताला खांद्यापासून मनगटापर्यंत फ्रॅक्चर झाल्याचे पोलिसांनी तक्रारीत नमूद केले आहे. राधा यांचा मुलगा केशव यालाही मुका मार लागल्याचे तक्रारीत नमूद आहे. राधा यांचे पती संजय जाधव यांनी याप्रकरणी तक्रार दिली.

भोसरी एमआयडीसी पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी ट्रेलरचालक जितराम भवरलाल चौधरी (वय ३२, राहणार राजस्थान) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(ए), १२५(बी) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम ११९ व १७७ नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार साबळे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories