लोहगडाविषयी आक्षेपार्ह भाष्य करणे थांबवावे, गिर्यारोहण महासंघाचे आवाहन

लोहगडाविषयी आक्षेपार्ह भाष्य करणे थांबवावे, गिर्यारोहण महासंघाचे आवाहन

लोहगडाविषयी आक्षेपार्ह भाष्य करणे थांबवावे, गिर्यारोहण महासंघाचे आवाहन

पुणे, ता. २ जुलै २०२६ -   लोहगड येथे नुकतीच घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेनंतर समाजमाध्यमांवर तसेच इतर माध्यमांतून लोहगडाविषयी आक्षेपार्ह, अवमानकारक आणि बदनामीकारक भाष्य करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत निषेधार्ह असून ती तत्काळ थांबविण्यात यावी, असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ तसेच समस्त गडप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 याबाबत, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आपले किल्ले हे जागतिक वारसा स्थळ आहेत, शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचे साक्षीदार आहेत. मात्र लोहगडावर घडलेल्या घटनेमुळे त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

लोहगड हा केवळ पर्यटनस्थळ नसून, महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित पवित्र श्रद्धास्थान आहे. अशा गडाच्या संदर्भात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेचे निमित्त करून समाजमाध्यमांवर विविध रील्स, मीम्स आणि अवमानकारक आशय प्रसारित केला जात आहे. ही प्रवृत्ती अत्यंत खेदजनक असून आपल्या ऐतिहासिक वारशाचा आणि समाजाच्या भावनांचा अनादर करणारी आहे.

म्हणून अशा प्रकारचे आक्षेपार्ह, दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध संबंधित यंत्रणांनी तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी आमची शासनाकडे नम्र विनंती आहे. आपल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा सन्मान राखणे आणि त्यांचे पावित्र्य जपणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे महासंघाने सांगितले आहे. 







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories