देहूगावात चोरट्याचा डल्ला; ट्रान्सफॉर्मर उघडून तांब्याची तार लंपास

देहूगावात चोरट्याचा डल्ला; ट्रान्सफॉर्मर उघडून तांब्याची तार लंपास

देहूगाव | २७ नोव्हेंबर २०२६ : देहूगावातील वाणिमाळा परिसरात इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर उघडून त्यातील ताब्यांची तार चोरल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८च्या दरम्यान वाणीमळ्यातील गट क्रमांक ८६ येथे ही चोरी झाली. अज्ञात व्यक्तीने तेथील इेलक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) उघडून त्यातील तांब्याची तार काढून नेली.

ईश्वर राजेंद्र चौधरी (वय ३४, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली.  चोरीला गेलेल्या ७० किलो तारेची किंमत ४५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी २६ नोव्हेंबरला अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories