पिंपरीत चोरट्याची हातसफाई ; इलेक्ट्रिकल दुकानात हजारोंच्या मालावर डल्ला

पिंपरीत चोरट्याची हातसफाई ; इलेक्ट्रिकल दुकानात हजारोंच्या मालावर डल्ला

पिंपरी | २७ नोव्हेंबर २०२६ : पिंपरीत इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून घरगुती वायरिंगचे साहित्य चोरीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ च्या दरम्यान पिंपरीतील हेमू कलानी मार्केटमधील जिया इलेक्ट्रिकल या दुकानात चोरी झाली. दुकान बंद असताना एका अज्ञात व्यक्तीने छताचा लोखंडी पत्रा उचकटून आत प्रवेश केला. 

त्यानंतर दुकानातील लाल आणि काळ्या रंगांच्या वायरची एकूण ४७ बंडले चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, एकूण ९० हजारांचा माल चोरीला गेला आहे.

दिपक फुलचंद लोढा (वय ३७, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून पिंपरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल केला. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पठाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories