डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया प्रतिबंधासाठी अशी घ्या काळजी, महापालिकेचे आवाहन

डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया प्रतिबंधासाठी अशी घ्या काळजी, महापालिकेचे आवाहन

डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया प्रतिबंधासाठी अशी घ्या काळजी, महापालिकेचे आवाहन 

पिंपरी, ता. १६ जुलै २०२६ -  पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रसार प्रामुख्याने साचलेल्या स्वच्छ पाण्यात होणाऱ्या डासांच्या उत्पत्तीमुळे होतो.  त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात व परिसरात खालील बाबींची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 


➡️ टाकाऊ वस्तूंची योग्य विल्हेवाट लावा.

➡️ जुने टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकचे कप, बाटल्या, डबे किंवा इतर भंगार वस्तूंमध्ये पाणी साचण्याची शक्यता असते. अशा वस्तू घराजवळ किंवा मोकळ्या जागेत साठवून ठेवू नयेत.

➡️ कुलर, फुलदाण्या, पक्ष्यांच्या पाण्याची भांडी आणि फ्रिजच्या ट्रेमधील पाणी नियमित बदला.

➡️ गच्ची, बाल्कनी, अंगण, सोसायटी परिसर, बांधकाम स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी साचल्यास त्वरित त्याची विल्हेवाट लावावी.

➡️ घर आणि परिसरात पावसाचे किंवा सांडपाणी साचू देऊ नका.

➡️ अगदी कमी प्रमाणातील साचलेल्या पाण्यातही डासांची पैदास होऊ शकते. त्यामुळे दर ७ दिवसांनी हे पाणी रिकामे करून स्वच्छ करावे.

➡️ पाण्याच्या टाक्या, ड्रम, हौद आणि पाणीसाठ्याची भांडी नेहमी झाकून ठेवा.

➡️ आठवड्यातून एक दिवस 'कोरडा दिवस' पाळा.

➡️ उघड्या पाण्यात डास अंडी घालतात. त्यामुळे सर्व पाणीसाठे घट्ट झाकणांनी बंद ठेवणे आवश्यक आहे.

➡️ दर आठवड्याला एक दिवस निश्चित करून घरातील सर्व पाणीसाठे रिकामे करा, स्वच्छ घासा आणि कोरडे ठेवा. डेंग्यूचा डास साधारणतः ७ दिवसांत विकसित होतो. त्यामुळे 'कोरडा दिवस' पाळल्यास डासांची उत्पत्ती रोखता येते.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories