news
clock
शहरात सात नवीन रेशन दुकानांचे व्यवस्थापन महिलांच्या हाती

शहरात सात नवीन रेशन दुकानांचे व्यवस्थापन महिलांच्या हाती

शहरात सात नवीन रेशन दुकानांचे व्यवस्थापन महिलांच्या हाती

पिंपरी, ता. २६ - शहरात काही महिन्यांपूर्वी नवीन ७ रेशन दुकानांना मंजुरी मिळाली होती. निवडणुकीमुळे ती सुरु होण्यास विलंब झाला होता. ही सात दुकाने आता सुरु झाली असून त्यांचे व्यवस्थापन महिला बचत गट पाहणार आहेत. त्यामुळे रेशनिंग व्यवहार अधिक शिस्तबद्ध  व पारदर्शक होईल अशी आशा आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड (अ), पिंपरी (ज) आणि भोसरी (फ) अशी तीन परिमंडळे आहेत. या तिन्ही परिमंडळांतील ४ लाख २३ हजारांहून अधिक रेशनिंगचे लाभार्थी आहेत. शहरात यापूर्वी एकूण २८ महिला बचत गटांच्या महिला रेशनिंग दुकाने चालवत होत्या. 'अ' परिमंडळात चार, तर 'ज' परिमंडळात तीन अशी एकूण सात दुकाने सुरू झाली आहेत.

 रेशनिंग दुकानांचे व्यवस्थापन महिलांकडे दिल्याने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे आणि धान्य वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक होणार आहे, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

''शहरातील सर्व नवीन मंजूर स्वस्त धान्य दुकानांतून प्रत्यक्ष धान्यवाटप सुरू करण्यात आले आहे. नवीन दुकानांनाही लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.'' असे 'ज' परिमंडळ अधिकारी प्रदीप डंगारे यांनी सांगितले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories