news
clock
पुरंदर  विमानतळासाठी संपादित करावयाच्या जमिनीला एकरी दीड कोटी दर निश्चित

पुरंदर विमानतळासाठी संपादित करावयाच्या जमिनीला एकरी दीड कोटी दर निश्चित

 पुरंदर  विमानतळासाठी संपादित करावयाच्या जमिनीला एकरी दीड कोटी दर निश्चित

पुणे, या. 30  - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आगामी सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला एकरी दीड कोटी रुपये दर निश्चित केला आहे. पुढील महिन्यात 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर भूसंपादन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 पुरंदर तालुक्यातील सात गावांतील जागा विमानतळासाठी अंतिम केली आहे. मात्र, जागा मालकांना किती मोबदला द्यायचा, हे निश्चित होत नसल्याने भूसंपादन रखडले होते. आता सरकारने भूसंपादनाचा दर निश्चित केला आहे. पुढील महिन्यात चार मे पासून मोबदला देऊन जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. 

 भूसंपादन करताना जागेबरोबरच घरे, झाडे, विहीरी व फळबागांचे मूल्यांकन स्वतंत्रपणे केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार हेक्टर क्षेत्र ताब्यात घेतले जाईल.  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

विमानतळ भूसंपादनासाठी 'हुडको' कडून सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास सरकारची   मान्यता मिळाली असून पहिल्या टप्प्यात ५०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories