लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाची नियोजन बैठक
पिंपरी, ता. २ जुलै २०२६ - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या नियोजनाबाबत गुरुवारी (ता. २) महापालिकेमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला.
यंदाचा जयंती महोत्सव अधिक भव्य, दिव्य आणि विचारप्रबोधन करणारा व्हावा, यासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा अधिक व्यापक प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
समाजबांधवांनी मांडलेल्या सूचना व अपेक्षांची दखल घेत लोकसहभागातून यंदाचा जयंती महोत्सव अधिक प्रेरणादायी, संस्मरणीय आणि सर्वसमावेशक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस सत्तारूढ नेते प्रशांतजी शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेबजी भोईर, कला, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मधुराताई शिंदे, नगरसदस्य जितेंद्र ननावरे, बापू घोलप व विश्वस्त मार्तंड मल्हार जेजुरी संस्थान अनिलजी सौंदडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
- सामाजिक कार्यकर्ते, Social Activists, सांस्कृतिक कार्यक्रम, Cultural Programmes, शैक्षणिक उपक्रम, Educational Activities, समाजोपयोगी उपक्रम, Social Welfare Activities, विचारप्रबोधन, Social Awareness
- जयंती नियोजन बैठक, Jayanti Planning Meeting
- Annabhau Sathe Jayanti, जयंती महोत्सव,
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, Lokshahir Annabhau Sathe, अण्णाभाऊ साठे जयंती