पिंपरी-चिंचवड
गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल - उद्योगमंत्री उदय सामंत
Apr 03 2026
90
गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल - उद्योगमंत्री उदय सामंत
पिंपरी, ता. ३ - ''गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन पुरवठा रोखला जात असेल, तर संबंधितांवर सरकारकडून कडक कारवाई केली जाईल.'' असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत त्यांनी दिला.
शुक्रवारी (ता. ४) उदय सामंत पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सामंत म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचनांनुसार हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजकांना एमएनजीएल गॅस पुरवठा सुरळीतपणे केला जाणे अपेक्षित आहे. मात्र काही ठिकाणी जाणीवपूर्वक विलंब होत असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत.''
''कोणत्याही परिस्थितीत कृत्रिम अडथळे निर्माण करुन उद्योगांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,'' असे सामंत यांनी सांगितले आहे.