news
clock
लाईट गेल्याची तक्रार महावितरणच्या अधिकृत प्रणालीद्वारेच नोंदवा,  'महावितरण'चे नागरीकांना आवाहन

लाईट गेल्याची तक्रार महावितरणच्या अधिकृत प्रणालीद्वारेच नोंदवा, 'महावितरण'चे नागरीकांना आवाहन

लाईट गेल्याची तक्रार महावितरणच्या अधिकृत प्रणालीद्वारेच नोंदवा,  'महावितरण'चे नागरीकांना आवाहन 

पिंपरी, ता. २४ - लाईट गेली थोडावेळातच नागरीकांकडून महावितरणच्या कामगारांना फोन केला जातो, आपण फोन करताना हे कर्मचारी कामावर असतील याचा विचार केला जात नाही. विजप्रवाहाच्या दुरुस्तीचे जोखमीचे काम करत असताना मध्येच 'फोन रिसीव करताना' मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे नागरीकांनी कर्मचाऱ्यांना थेटफोन न करता महावितरणच्या अधिकृत प्रणालीद्वारेच तक्रार नोंदवावी, असे आवाहन 'महावितरण'ने केले आहे.

'महावितरण'ने सांगितले आहे की, दुरुस्तीचे काम करताना कर्मचाऱ्याचे पूर्म लक्ष कामावर असणे गरजेचे आहे. मध्येच फोन आल्यास कामागरांचे लक्ष विचलीत होऊन अपघाताची शक्यता निर्माण होते. तसेच  वैयक्तिक फोनवर आलेल्या तक्रारींची नोंद अधिकृत प्रणालीत होत नाही. त्यामुळे फॉल्ट शोधण्यासाठी वेळ लागतो आणि तक्रार निवारणात विलंब होतो. महावितरण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यामुळे ऑनलाइन तक्रार नोंदवली तर ती त्वरीत संबंधित विभागाकडे जाते व तक्रार सोडवली जाते. 

याबाबत 'महावितरण'चे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी म्हणाले की, ''ग्राहकांनी कर्मचाऱ्यांना वैयक्तिक थेट फोन करण्याऐवजी अधिकृत टोल-फ्री क्रमांक, अॅप किंवा ऑनलाइन प्रणालीचा वापर करावा. यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता राखली जाईल आणि तक्रारींचे जलद निवारण होईल. ''


- तक्रारीसांठी संपर्क -

- टोल-फ्री क्रमांक - १९१२, 

                            १८००-२३३-३४३५,

                            १८००-२१२-३४३५

- व्हॉट्सअॅप - ९१६७७७७७२१ वर 'हाय' पाठवा. भाषा निवडा. बिल, पेमेंट, तक्रार नोंदणी सुविधा. 'ब्ल्यू टिक' खात्री करुनच वापर करा


- एसएमएस व मिस कॉल सेवा :

  मिस कॉल : ०२२-५०८९७१००

  एसएमएस : 'नोपावर' (ग्राहक क्रमांक) ९९३०३९९३०३ वर पाठवा


-  मोबाइल अॅप  -

   'महावितरण' मोबाइल अॅपवर तक्रार नोंदवा

  एकाच अॅपमध्ये अनेक वीज जोडण्यांचे व्यवस्थापन

- संकेतस्थळ - www.mahadiscom.in 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories