पुनावळेमधील ऑक्सीजन पार्कमध्ये जास्तीचे सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, युवा सनेचे उपशहरप्रमुख सागर शिंदे यांची मागणी
Apr 24 2026
41
पुनावळेमधील ऑक्सीजन पार्कमध्ये जास्तीचे सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, युवा सनेचे उपशहरप्रमुख सागर शिंदे यांची मागणी
पिंपरी, ता. २४ - पुनावळे येथील ऑक्सीजन पार्क उद्यानात सुरक्षा वाढवण्यासाठी जास्तीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी युवा सेनेचे पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुख सागर एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहेत. त्यांनी यासंदर्भात ड प्रभाग विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट सिटी अंतर्गत गार्डनमध्ये आधीच काही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असले तरी ते अपुरे ठरत आहेत. गार्डन परिसरात मोठ्या आणि लहान झाडांची संख्या जास्त असल्यामुळे अनेक ठिकाणी अंधाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गार्डनमध्ये अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
उन्हाळी सुट्टया लागत असल्याने नागरीकांची उद्यानामध्ये गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे नागरीकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने या मागणीची तत्काळ दखल घेऊन जास्तीचे कॅमरे बसवण्याची कार्यवाही करावी, अशी स्थानिक नागरीकांची आग्रही मागणी आहे.