'जनसुनावणी'द्वारे सुटणार महिलांच्या समस्या, राष्ट्रीय महिला आयोगाचा ८ ते १४ मार्चपर्यंत विशेष उपक्रम
Mar 07 2026
33
'जनसुनावणी'द्वारे सुटणार महिलांच्या समस्या, राष्ट्रीय महिला आयोगाचा ८ ते १४ मार्चपर्यंत विशेष उपक्रम
पुणे, ता. ६ - जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय महिला आयोग ८ ते १४ मार्च या कालावधीत देशभरातील ५०० जिल्ह्यांमध्ये जनसुनावणी घेऊन महिलांच्या समस्या सोडवणार आहे. महाराष्ट्रात तीन ठिकाणी जनसुनावणी होणार आहे, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत दिली.
'महिलांवरील अत्याचार थांबवावेत, त्यांना न्याय मिळावा आणि कामाची समान संधी प्राप्त व्हावी यासाठी आयोग काम करत आहे. गेल्या काही काळापासून नियमित सुनावणी आणि जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांच्या समस्यांची सोडवल्या जात आहेत.
''महिला दिनानिनित्त राज्य महिला आयोगांच्या सहकार्याने देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जनसुनावणी घेतली जाणार आहे. या जनसुनावणीमध्ये १५ हजारपेक्षा जास्त तक्रारी जाणून घेऊन त्यावर मार्ग काढला जाणार आहे.'', असे रहाटकर यांनी सांगितले.