दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव वाटप... मिळाली नवी उमेद
पिंपरी, दि. २३ जुलै २०२६ - महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, एलिम्को (ALIMCO)आणि एस. आर. ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोरवाडी येथील दिव्यांग भवन येथे दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव (कॅलिपर) वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास आयुष्मान भारत योजनेचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, महापौर रवी लांडगे, व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, किशोर मोरे, डॉ. दत्ता मोरे, डॉ. किरण पावरा तसेच आनंद काटकर यांची उपस्थिती लाभली.
दिव्यांग बांधवांना अधिक सक्षम, स्वावलंबी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगण्यासाठी कृत्रिम अवयवांचे वाटप हा केवळ एक उपक्रम नसून, त्यांच्या आयुष्यात नवी आशा आणि नवसंजीवनी निर्माण करणारा सामाजिक संकल्प आहे. समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत संवेदनशीलतेने मदतीचा हात पोहोचवत सर्वसमावेशक, सशक्त आणि आत्मनिर्भर समाज घडविण्यासाठी अशा लोकहिताच्या उपक्रमांना सातत्याने बळ देण्याचा आपला निर्धार आहे, असे महापौर लांडगे यांनी सांगितले.
- एलिम्को, ALIMCO, एस आर ट्रस्ट, SR Trust, सामाजिक उपक्रम, Social Initiative, आयुष्मान भारत योजना
- वाढदिवसानिमित्त उपक्रम, Birthday Initiative
- महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
- कॅलिपर वाटप, Caliper Distribution, दिव्यांग भवन मोरवाडी, Divyang Bhavan Morwadi
- दिव्यांग बांधव, Divyang Persons, दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप, Artificial Limb Distribution