विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित

विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित

विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित

चिंचवड, पिंपरी आणि भोसरी मतदारसंघांसाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नियुक्त

पिंपरी, ता. २३ जुलै २०२६ : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर)-२०२६ कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि तातडीचे सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. मतदारांच्या शंका, अडचणी आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचा १९५० हा हेल्पलाईन क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून, संबंधित विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून मतदारांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, मतदार यादीतील नोंदी तसेच इतर संबंधित बाबींमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी राहुल शेडगे (९९२२५०१९७७), २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी अतुल किर्वे (९८६०३१०८६६) आणि २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी पंकज पवार (९८२२२३५४८०) यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील राखीव मदत कक्षासाठी दिलीप आंब्रे (८६९८८४८३२४) यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान मतदारांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत संदेशांवर किंवा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत मदत कक्ष अथवा भारत निवडणूक आयोगाच्या १९५० हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून अचूक माहिती प्राप्त करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, मतदार यादीची अचूकता आणि पारदर्शकता ही सक्षम लोकशाहीची पूर्वअट आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात प्रत्येक पात्र मतदाराला आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत वेळेत आवश्यक कार्यवाही करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.

अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले, मतदारांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी महापालिकेने विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. मतदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत मदत कक्ष किंवा १९५० हेल्पलाईनवर संपर्क साधूनच माहिती घ्यावी. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत प्रशासनाची सेवा पोहोचविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध आहे.

उप आयुक्त सचिन पवार म्हणाले, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मतदारांना सुलभ आणि तत्काळ माहिती उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या शंका, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक मार्गदर्शनाबाबत त्वरित प्रतिसाद देण्यात येणार आहे. नागरिकांनी अधिकृत माध्यमांद्वारे माहिती घेऊन मतदार यादीतील आपली नोंद अचूक असल्याची खात्री करावी आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान आवश्यक ती माहिती वेळेत उपलब्ध करून घेऊन मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories