मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसूर पाटी येथे घेतले श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसूर पाटी येथे घेतले श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन
पिंपरी, ता. २३ जुलै २०२६ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. २२) दसूर पाटी येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव”,असे साकडे त्यांनी यावेळी घातले. पादुकांचे दर्शन घेण्याचा योग येणे, हे माझे मोठे भाग्य असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीरथाचे सारथ्यही केले.
वारीतील वारकरी हे माऊलीचे जिवंत स्वरूप आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात मागील दोन वर्षांपासून पालखीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा शासन उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे यावर्षीच्या वारीला विक्रमी भाविक येत आहेत. एआय तंत्रज्ञानाद्वारे भाविकांची संख्याही मोजली जात आहे. वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. शौचालये, सफाई कर्मचारी, पुरेसा पाणीपुरवठा, पिण्याचे पाणी, जर्मन हँगर, चरण सेवा उपक्रम, आरोग्य पथके आदींच्या माध्यमातून सुविधा देण्यात येत आहेत.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार अभिजीत पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते.
- पालखीरथ सारथ्य, Palkhi Rath Sarathi, महाराष्ट्र, Maharashtra
- पादुका दर्शन, Paduka Darshan, आषाढी वारी, Ashadhi Wari, पंढरपूर वारी, Pandharpur Wari
- दसूर पाटी, Dasur Pati, संत तुकाराम महाराज, Sant Tukaram Maharaj, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, Sant Dnyaneshwar Mauli
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, Chief Minister Devendra Fadnavis, देवेंद्र फडणवीस वाढदिवस, Devendra Fadnavis Birthday