news
clock
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणासाठी प्लेटवाटप

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणासाठी प्लेटवाटप

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणासाठी ताटांचे वाटप 

पिंपरी, ता. २४ - कुदळवाडी येथील मनपा शाळा क्रमांक 89 मध्ये विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना जेवणासाठी ताटांचे वाटप  करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्त्या निशा यादव यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाच्या सुट्टीत खिचडीभात मिळतो. त्यासाठी त्यांना घरुन ताट आणणे सोयीचे नाही. शाळेतच जेवणाचे ताट मिळाले तर ज्यांना व्यवस्थितपणे जेवता येईल, या उद्देशाने प्लेट वाटप करण्यात आले आहेय  

या पुढील काळातही असे समाजोपयोगी उपक्रम आम्ही राबवत राहू, असा मानस निशा यादव व सहकारी यांनी व्यक्त केला. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories