news
clock
इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रकियेत बदल होणार, नवीन नियमावली लवकरच

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रकियेत बदल होणार, नवीन नियमावली लवकरच

 इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रकियेत बदल होणार, नवीन नियमावली लवकरच 

पुणे, ता. ३  - इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रकिया लांबत असल्याने या प्रक्रियेत सुधारणा करुन शिक्षण विभाग लवकरच सुधारित नियमावली जारी करणार आहे, अशी माहिती प्रशासनातून दिली आहे. 

अकावीच्या प्रवेश प्रकिया लांबत चालली आहे. राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग सुरु व्हायला ऑगस्ट महिना उजाडला. तरीही संस्थाचालकांनी त्यांच्या हितासाठी फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रवेशाच्या विशेष फेऱ्या आयोजित केल्याचे समोर आले. या गोष्टी व अन्य त्रुटींचा शिक्षण विभागाकडून आढावा घेतला जात आहे. 

यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता प्रवेश प्रक्रियेत बदल केले जाणार आहेत.''प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यात प्रवेशाचे टप्पे कमी करण्याबाबत सूचना केली आहे.'' असे माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी सांगितले आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories