एटीएम कार्ड बदलून ज्येष्ठ नागरिकाची 30 हजारांची फसवणूक

एटीएम कार्ड बदलून ज्येष्ठ नागरिकाची 30 हजारांची फसवणूक

थेरगाव | 30 ऑगस्ट 2026 : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा करून अज्ञात व्यक्तीने त्यांचे कार्ड बदलले. त्यानंतर पिन क्रमांकाचा वापर करून खात्यातून 30 हजार रुपये काढत फसवणूक केल्याचा प्रकार डांगे चौकात घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तम शंकर कुटे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:15 ते दुपारी 12:00 या वेळेत डांगे चौकातील एसबीआय बँकेच्या शेजारी असलेल्या एटीएममध्ये घडली. याप्रकरणी 29 ऑगस्ट रोजी रात्री 9:53 वाजता गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एटीएममधून पैसे काढत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. “काका, तुम्ही कार्ड उलटे टाकले आहे,” असे सांगत त्याने मदतीचा बहाणा केला. एटीएममध्ये कार्ड पुन्हा टाकून देण्याचे नाटक करत आरोपीने फिर्यादीचे मूळ कार्ड स्वतःकडे ठेवले आणि त्यांना दुसरे कार्ड दिले.

या प्रक्रियेदरम्यान आरोपीने फिर्यादीचा पिन क्रमांकही पाहून घेतला. त्यानंतर दुसऱ्या एटीएममधून त्यांच्या परवानगीशिवाय 30 हजार रुपये काढण्यात आले. खात्यातील व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 470/2026 नोंदवण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि व्यवहारांची माहिती तपासून आरोपीचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories